१४ वर्षांचा दुरावा संपला, राखीच्या निमित्ताने आहुजा कुटुंब एकत्र

कृष्णा-आरतीसोबत सुनीता दिसताच चाहते सुखावले, पण गोविंदा कुठे?

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
मुंबई
asunita sahuja रक्षाबंधनाचा सण होऊन तीन दिवस उलटले असले, तरी आता फिल्म इंडस्ट्रीतून समोर आलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांची लेक टीना आहुजाने रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राखीपौर्णिमेनंतर हे फोटो समोर आले असले, तरी त्यातील कुटुंबीयांचे हसरे चेहरे पाहून चाहतेही आनंदले आहेत. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये सुनीता आहुजा यांचा भाचा कृष्णा अभिषेक आणि भाची आरती सिंह यांच्यासोबतचा स्नेह पाहायला मिळत असल्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मात्र, या संपूर्ण सेलिब्रेशनमधून अभिनेता गोविंदा मात्र गायब असल्याने चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
 

govinda missing from raksha bandhan celebration asunita sahuja reunites with krushna abhishek after 14 years 
गोविंदाची लाडकी लेक टीना आहुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये टीना, तिचा भाऊ यशवर्धन आहुजा, तसेच कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह हे भावंड रक्षाबंधन साजरं करताना दिसत आहेत. “आमचं राखी सेलिब्रेशन!” अशी खास कॅप्शन टीनाने या पोस्टला दिली आहे. या फोटोंमधून सुनीता आहुजा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक तसेच भाची आरती सिंह यांच्यातील नातं आता पूर्वपदावर आल्याचं स्पष्ट होत आहे.
मात्र, या फोटोंमध्ये अभिनेता गोविंदा कुठेही दिसत नसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे आहुजा कुटुंबीयांनी एकत्र येत रक्षाबंधनाचा सण साजरा केला, तर दुसरीकडे गोविंदा या सेलिब्रेशनमध्ये दिसला नाही. त्यामुळे त्याच्या कौटुंबिक नात्यांबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात गेल्या काही काळापासून मतभेद असल्याची चर्चा आहे. काही काळापूर्वी दोघांमध्ये सोशल मीडियावर ‘कोल्ड वॉर’ही पाहायला मिळालं होतं. सुनीता यांनी गोविंदाच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीबाबत प्रश्न उपस्थित करत काही टिपण्णी केली होती. त्यावर गोविंदानेही सुनीता यांनी मर्यादेत राहून बोलायला हवं, असं सुनावलं होतं. आता याच वादामुळे गोविंदा आपल्या घरातील रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनपासून दूर राहिला असावा, असा अंदाज काही सोशल मीडिया युजर्स व्यक्त करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनीता आहुजा यांनी गोविंदाविरोधातील घटस्फोटाची याचिका मागे घेतली होती. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यानंतर गोविंदाच्या वतीने एक सार्वजनिक नोटीसही जारी करण्यात आली होती. या नोटीसमध्ये मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना इशारा देण्यात आला होता.
दुसरीकडे, कृष्णा अभिषेक asunita sahuja आणि सुनीता आहुजा यांच्यात जवळपास १४ वर्षांनंतर पॅच-अप झालं आहे. काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये मतभेद झाले होते. कालांतराने त्यांच्यातील दरी आणखी वाढत गेली. मात्र, एप्रिल २०२६ मध्ये ‘लाफ्टर शेफ्स’ या रिॲलिटी शोच्या सेटवर सुनीता आहुजा अचानक पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी कृष्णा अभिषेक आणि काश्मीरा शाह यांची भेट घेतली होती.
त्यानंतर आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने कृष्णा, आरती आणि सुनीता आहुजा एकत्र दिसल्याने चाहत्यांना मोठा सुखद धक्का बसला आहे. अनेक वर्षांचा दुरावा संपल्यानंतर कुटुंब पुन्हा एकत्र येताना दिस