खाकी मनगटावर ज्येष्ठांची राखी

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Hudkeshwar Police Station लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
 
 
khaki
 
 
 
मंडळाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांच्या पुढाकाराने व अध्यक्ष कॅप्टन प्रभाकर विंचुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपनिरीक्षक शलाका शीरसाठ प्रमुख उपस्थित होत्या. मुंबईचे पोलीस निरीक्षक विशाल आरोसकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना राख्या बांधून शुभेच्छा दिल्या. पोलिसांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. वेळी सुनिता गुडदे, कुसुम चौधरी, मेघा देशमुख, काशीनाथ गुमगावकर, दीपक नक्षणे, सारंग काटे, हिरकणी ज्येष्ठ महिला मंडळाच्या विणा कुकडे, वत्सला परसो, माधवी मोहरे, मीरा तराळे, मास्टर श्रेयांस रामेकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सौजन्य:दीपक शेंडेकर,संपर्क मित्र