वाशीम
illegal-cattle-transport अवैधरित्या गोवंश वाहतुक करणार्यावर कारवाया करण्याकरीता वरीष्ठांच्या आदेशाने विशेष मोहिम हातात घेण्यात आली आहे. विशेष मोहिमेच्या अनुषंगाने स्थागुशा चे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ऑगस्ट रोजी अवैध गोवंश वाहतुक करणार्यावर प्रभावी कारवाई करुन आरोपी इलीयास खान बशीर खान, वय ५२ वर्ष, रा. काजीपुरा, ता. मंगरुळनाथ जि. वाशीम यास अटक केली असून, त्याच्याकडून गोवंशासह ३४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की, गुप्त माहिती च्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, वाशीमच्या पथकाने वाशीम ते मंगरुळनाथ रोड येथील कळंबा महाली परिसरात गोवंशीय जनावराची अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थागुशा येथील पथकाने वाहनाची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान उपरोक्त आरोपी कडुन २३ बैलवर्गीय जनावरांची वाहतुक करतांना आढळून आले. या काराईमध्ये एक आयशर व दोन बोलेरो पिकअप वाहने असा एकुण अंदाजे ३४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पुढील तपास पोलिस स्टेशन वाशीम (ग्रामीण) यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे अवैधरित्या गौवंश वाहतुक करणार्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, पोउपनि सचिन गोखले, पोहवा राहुल व्यवहारे, विनोद अवगडे, दिलीप देवकते, पोअं राजकुमार यादव, भुषन ठाकरे, विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे, चालक सुनिल तायडे यांनी केली आहे.