तीन व्हॉल्व खुले, मनपा झोपेत !

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Open valves सुगत नगर येथील एका चौकात नागपूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचे तब्बल तीन व्हॉल्व उघड्यावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हॉल्वभोवती कोणतेही संरक्षक झाकण नसल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका आहे.

mate 
 
 
पावसाळ्यात पाणी साचल्याने हे उघडे व्हॉल्व सहज लक्षात न आल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. या चौकातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. वाहन व्हॉल्ववर आदळल्यास वाहनांचे नुकसान होण्यासोबतच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.अपघात झाल्यानंतरच मनपाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने व्हॉल्व सुरक्षित झाकणाने बंदिस्त करून परिसरातील पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र