राखीच्या धाग्यातून मायेची नाती

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Rajagriha Foundation राजगृह फाउंडेशन, बेसातर्फे ३० ऑगस्ट रोजी बेसा येथील कार्यालयात सामाजिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बेसा-पिपळा नगर पंचायत क्षेत्रातील विधवा, परित्यक्ता व दिव्यांग महिलांनी सहभागी होत फाउंडेशनचे संस्थापक धनराज बडोले तसेच मान्यवरांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सहभागी महिलांना राजगृह फाउंडेशनतर्फे साडी, ड्रेस आदी भेटवस्तू देऊन धनराज बडोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
 
hot
 
 
नगर पंचायत अध्यक्षा कीर्ती बडोले यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाला राजेंद्र दिवारे, अनिल मेहरे, ज्ञानबंधू शुक्ला, राजेश बोबडे, स्वामिनी महिला सेवा संस्थेच्या पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया शुक्ला व अर्चना मेहरे यांनी परिश्रम घेतले. संचालन छाया शुक्ला यांनी केले, तर आभार अनिल मेहरे यांनी मानले.
राजगृह फाउंडेशन, बेसा-पिपळा नगर पंचायत,तरूणभारत, नागपूर
सौजन्य:राजेंद्र दिवारे,संपर्क मित्र