सेलू
raksha-bandhan भारतीय जनता पार्टी, सेलू तालुका सचिव तथा युवती मोर्चाच्या तालुका सचिव ज्ञानेश्वरी मसराम यांच्या पुढाकारातून पोलिस बांधवांना रख्या बांधण्यात आल्या.
दिवाळी, होळी, गणेशोत्सव यांसह विविध सणांच्या काळात पोलिस स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावतात. त्यांच्या या सेवाभावाची जाणीव ठेवून रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांना राखी बांधण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वरी मसराम यांनी आमच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वेळी खंबीरपणे पोलिस उभे राहतात. त्यामुळे आज राखी बांधून पोलिसांविषयी आदर आणि आपुलकी व्यक्त करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पोलिस बांधवांनीही उपस्थित बहिणींना विश्वास देत, कोणत्याही अडचणीत असाल, कोणतीही समस्या असेल तर न घाबरता कधीही आम्हाला फोन करा. तुमचे भाऊ म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला पूजा रुयारकर, मयुरी खांदारे, आरती रुयारकर, वैष्णवी मसराम, साची रामटेके, राणी कुंभरे, कल्याणी वरवाडे यांच्यासह युवती मोर्चाच्या सदस्य उपस्थित होत्या.