मानोरा शहरातील नागरीक मोकाट कुत्र्यामुळे दहशतीत

एकाच कुत्र्याने २५ ते ३० लोकांना घेतला चावा

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
मानोरा,
stray dogs मानोरा शहरामध्ये आज सकाळपासून एका मोकाट कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिसाळलेला असण्याची शयता असलेल्या एकाच कुत्र्याने सकाळपासून आतापर्यंत २५ ते ३० लोकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
 
 
stray dogs
 
सकाळी ७ वाजल्यापासून या कुत्र्याने बाजार परिसर, बसस्थानक रोड, ग्रामीण रुग्णालय परिसर आणि मुख्य चौकात फिरणार्‍या शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि दुकानदारांवर अचानक हल्ला करण्यास सुरुवात केली. अनेकांना पायाला, हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत.या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व नागरिकांनी तातडीने मानोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतले. रुग्णालयात अँटी रेबीज लस घेण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठविण्यात आले आहे.
मानोरा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. वेळीच नसबंदी मोहीम राबविली असती तर आजची वेळ आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.stray dogsसध्या संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध प्रशासन घेत असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
भटकी कुत्रे व पाळीव मोकाट जनावरे यांचा शहरातील रहिवासी नागरिकांना दैनंदिन जीवन जगताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली असल्याने संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे.