अवैध स्थलांतरितांविरोधात सौदीकडून कारवाईचा धडाका

पंधरा हजार नागरिकांना केले हद्दपार

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
रियाध,
illegal immigrants सौदी अरेब सरकारने अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी मोहीम सुरू केली असून, गेल्या सहा दिवसांत देशभरात राबविण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा मोहिमेत १४,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर १४,९०५ परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले. यात प्रामुख्याने विविध ठिकाणी कामावर असलेल्यांचा समावेश आहे.
 
 
illegal immigrants
 
 
सौदी अरब प्रशासनाने रहिवासी, कामगार आणि सीमा सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांनी देशव्यापी मोहिमा राबवल्या. देशात अवैधपणे प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्या १,४५० लोकांना अटक केली. यापैकी ४१ टक्के येमेनी आणि ५८ टक्के इथिओपियन नागरिक होते. सहा दिवसांत १८,९१४ उल्लंघनकर्त्यांना प्रवासाची कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांच्या राजनैतिक दूतावासांकडे पाठवले आणि १४,९०५ जणांची देशातून हकालपट्टी करण्यात आली. स्थलांतरितांना मदत करणाऱ्या ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा लाख रियालपर्यंत दंड होऊ शकतो. बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन स्थानिक लोकांना करण्यात आले. यासाठी मक्का, मदिना, रियाध, पूर्व प्रांत आणि उर्वरित सौदी अरबसाठी स्वतंत्र क्रमांक जारी करण्यात आले आहेत. हद्दपार करण्यात आलेले आणि अटक झालेले कोणत्या देशाचे किती नागरिक आहेत, याचा तपशील जारी करण्यात आलेला नाही.