भागवत कथेत आज श्रीरामकथा, उद्या कृष्णजन्मोत्सव

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Shradhanand Peth श्रद्धानंद पेठ येथील श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी संध्यकाळी ७ ते ८ या वेळात श्रीरामकथेचे निरूपण होणार आहे. मंगळवार, १ सप्टेंबर रोजी संध्यकाळी ७ ते ८ या वेळात मंगलमय श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
 
 
mohini4
 
 
कथाकार ह. भ. प. मोहिनी देव पुजारी यांच्या रसाळ वाणीतून श्रीरामचरित्राचे श्रवण तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमास भाविकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र