सिंदीरेल्वे
solar-project-irregularities ३१ ऑगस्टसमीपच्या दहेगाव (गो.) ग्रामपंचायतची ग्रामसभा शांततेत पार पडली. यावेळी अनेकांच्या मागणीनुसार गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केल्या जाईल, असे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी देवानंद पानबुडे यांनी दिले.
सकाळी ११.३० वाजता ग्राम पंचायतच्या प्रांगणात सभेला सुरुवात झाली. रामकिशोर शिंगणधुपे यांनी सात वर्षातील अनेक खर्चावर बोट ठेवले. गावात एकाही सरकारी प्रतिष्ठानावर सौरऊर्जा पॅनल उभारण्यात आले नाही. मात्र, लेखा पुस्तिकेत तशी नोंद कशी दिसते असा सवाल सभाध्यक्ष माजी सरपंच संदीप वाणी यांना विचारला. माजी सरपंचाने लाखो रुपयांची तरतूद केल्याच्या त्या नोंदी आहेत. प्रशासक महाशयाच्या काळात पॅनल बसविले अथवा नाही. तसेच का उभारले नाही? याचे उत्तर ग्रामसेवक देतील, माझी बांधिलकी नाही असे असा खुलासा केला.
ग्रामसभेला उपस्थित इंटकच्या नेत्या अर्चना भोमले यांनी या भागात सुरू असलेल्या सर्व खदाण मालकांकडून ग्राम विकासासाठी ७० टक्के रक्कम जिल्हा खनीकर्म कार्यालय देते. ती करोडोंची थकबाकी कायद्यान्वये जनतेने वसूल करावी. त्यातून अनेक लोकोपयोगी कामं होतील, अशी सूचना केली. त्यांच्या सुचनेचे जनतेनी स्वागत केले.
ग्रामसभा सभा संपल्यानंतर अनेक सजग नागरिकांनी तीन मुद्दे घेत तेथील पोलिस ठाण्यात ग्रामसेवक लिलाधर गुडवार यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या सभेला तलाठी मुडे, अध्यापक पराते, महाबुधे, शेंद्रे, पिठाले आणि दोनशे गावकरी उपस्थित होते. ग्रामसेवक मात्र रजेवर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.