दुबई,
hormuz fire breaks out होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका ‘सुपर टँकर’ला दोन नौदलाच्या सुरुंगांची (नेव्हल माइन्स) धडक बसली. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’च्या (आयआरजीसी) माहितीनुसार, धडकेनंतर सदर टँकरला आग लागली आणि तो पूर्णपणे बंद पडला. इराणने या जहाजाचे नाव किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांची संख्या अद्याप जाहीर केलेली नाही. हा टँकर लारक बेटाच्या अनधिकृत सागरी मार्गावरून जात होता, असे आयआरजीसीने सांगितले. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरक्षिततेबाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या इतर जहाजांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. लारक बेट इराणच्या प्रमुख बंदरगाह बंदर अब्बासजवळ आणि होर्मुझच्या अगदी मध्यभागी स्थित आहे.

हा सागरी मार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण युद्धापूर्वी जगामध्ये वापरल्या जाणाऱ्या २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होत होती. इराण सध्या या बेटाजवळून जाणाऱ्या टँकरची तपासणी करीत आहे. तसेच जहाजांकडून सामुद्रधुनी पार करण्यासाठी २० लाख डॉलर म्हणजेच सुमारे १९ कोटी रुपयांपर्यंत कर वसूल करीत आहे. अमेरिकेच्या सैन्याने गेल्या आठवड्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गावरून सागरी सुरुंग हटवण्याचे काम पूर्ण केले होते. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात असलेले सर्व सुरुंग हटवण्यात आले आहेत किंवा निष्क्रिय करण्यात आले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सांगितले होते.hormuz fire breaks out कोणतेही जहाज किंवा बोट होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नवीन सागरी सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करेल, तर ते नष्ट केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. आयआरजीसीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते.
होर्मुझ अमेरिकन प्रदेश असल्याची ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीला ‘न्यू यूएस टेरिटरी’ म्हणजेच नवीन अमेरिकन प्रदेश असल्याचे सांगितले आहे. १८ ऑगस्ट रोजी त्यांनी पहिल्यांदाच होर्मुझवर अमेरिकेच्या नियंत्रणाची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी २३ ऑगस्ट रोजी ट्रूथ सोशलवर पुन्हा एक अशीच प्रतिमा शेअर केली, ज्यात होर्मुझला अमेरिकन प्रदेश म्हणून दाखवले होते.