केबल चोरीला गेल्याने ठाणेगावातील नळयोजना बंद

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
आरमोरी,
water scheme आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून नुकतेच ठाणेगाव येथील गाढवी नदीवरील जुन्या नळयोजनेच्या पंप हाऊसमधील 10 एचपीच्या दोन्ही मशिनच्या विद्युत सप्लायच्या अंदाजे 500 फुट महागडे केबल चोरांनी लंपास केल्याने ठाणेगाव येथील नळयोजना प्रभावित झाली असून दोन दिवसांपासून नळयोजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
 

water scheme 
 
 
ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेची रितसर तक्रार आरमोरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. सोबतच काही शेतकर्यांच्या शेतातील सिंचनाच्या पंपाचेही केबल चोरांनी लंपास केल्याची माहिती आहे. याआधी काही दिवसांपूर्वी ठाणेगाव येथील खोब्रागडी नदीवरील नवीन नळयोजनेच्या पंप हाऊस मधीलही केबलची चोरी झाली होती. तेव्हाही काही शेतकर्‍यांचे कृषी पंपाचे केबल चोरांनी लंपास केले होते.water scheme ठाणेगाव परिसरातील शेतशिवारात या सतत होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस विभागाने या भुरट्या चोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.