नागपूर,
YCCE Library यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रीय ग्रंथालयात संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील कार्यशाळा घेण्यात आली. दैनंदिन, शैक्षणिक व व्यावसायिक कामकाजात एआय साधनांचा प्रभावी वापर करता यावा, हा कार्यशाळेचा उद्देश होता.
सीएसई विभागप्रमुख डॉ. ललित दमाहे यांनी एआयचे महत्त्व व उपयोग स्पष्ट केले. असोसिएट हेड फैजल शेख यांनी विविध एआय साधनांचे प्रात्यक्षिक दाखविले. ओमर खान व सौरभ कुलकर्णी यांनी तांत्रिक सादरीकरण केले. केंद्रीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. राजेंद्र पहाडे यांनी आधुनिक ग्रंथालय सेवांमध्ये एआयचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. उदय वाघे यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.अजय डडमल यांनी प्रास्ताविक केले, तर अंजली सागरकर यांनी आभार मानले. देवराव काळे, संजय जाधव, प्रणाली रहाटे व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
सौजन्य: राजेंद्र पहाडे,संपर्क मित्र