अभिजीत दीपके पाकिस्तानी एजंट

दिल्ली पोलिसात लेखी तक्रार दाखल

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
अटकेची जोरदार मागणी
 
 
नवी दिल्ली,
abhijeet deepke pakistani agent कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेच्या विरोधात दिल्ली पोेलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार फैजान अन्सारी या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरने केली आहे. त्यांनी अभिजीत दीपकेच्या विरोधात एफआयआर नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. फैजानने अभिजीत दीपके पाकिस्तानी एजंट आणि उमर खालिदचा समर्थक असल्याचे म्हटले आहे. तसेच एका मीडिया संवादादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही केला आहे.
 
 
abhijeet deepke pakistani agent
 
डीसीपी कार्यालयाबाहेर तक्रारीची प्रत दाखवत फैजान अन्सारी यांनी वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जर दीपकेला अटक केली नाही तर ते देशात दंगली भडकवू शकतात. आज मी दीपकेच्या विरोधात डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कारण दीपके यांच्या माणसांनी माझ्यावर दोनदा हल्ला केला आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. माझ्यावर पुणे आणि औरंगाबादमध्ये हल्ला झाला. मी तिथेही दोन गुन्हे दाखल केले आहेत. दीपकेला तात्काळ अटक व्हावी, अशी माझी मागणी आहे.
 
दिल्ली पोलिसांची स्तुती करताना फैजान म्हणाले की, सोनम वांगचुक यांना योग्य वेळी अटक करण्यात आली, त्यामुळे दिल्लीतील परिस्थिती अधिक बिघडण्यापासून वाचली. दीपके प्रत्येक गोष्टीचा वपार स्वत:च्या फायद्यासाठी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.