तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
angad-patil : येथील ख्यातनाम विधीज्ञ अॅड. जीवन पाटील यांचा नातू अंगद तेजस पाटील याने 150 देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखून त्यांच्या राजधान्यांची नावे सर्वात वेगाने सांगण्याचा उल्लेखनीय विक्रम केला आहे.
नागपुरात राहणाèया 4 वर्षे 11 महिने वयाच्या अंगदने फ्लॅश कार्ड्सच्या साहाय्याने 150 राष्ट्रीय ध्वज ओळखले आणि त्या प्रत्येक देशाचे नाव तसेच त्याची राजधानी अवघ्या 8 मिनिटे 20 सेकंदात सांगितली. ही कामगिरी 17 जून 2026 रोजी अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आली. अंगद हा अॅड. तेजस पाटील आणि अॅड. रोहिणी पाटील यांचा मुलगा आहे. हे दोघेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकीली करतात.
ही अंगदची पहिलीच असामान्य कामगिरी नाही. 3 वर्षे आणि 3 महिने वयाचा असताना त्याने 50 देशांचे ध्वज ओळखून त्यांच्या राजधान्यांची नावे सांगण्याचा विक्रम केला होता. लहान वयातच त्याची विलक्षण स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता यातून दिसून आली.
जागतिक भूगोलाच्या ज्ञानासोबतच अंगदला भारतातील सर्व 54 भारतरत्न पुरस्कृत मान्यवरांची ओळख आहे. यातून भारतीय इतिहास आणि देशासाठी योगदान देणाèया व्यक्तीमत्वांविषयीची त्याची जिज्ञासा दिसून येते.
इतक्या लहान वयात अंगदने केलेली ही कामगिरी त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची आणि देशभरातील मुलांसाठी प्रेरणादायी बब आहे. जिज्ञासा, समर्पण आणि सातत्यपूर्ण शिक्षणाने लहान मुलांमध्ये किती मोठी क्षमता असते, हे त्याच्या या यशातून दिसून येते.