BMC कार्यालयाबाहेर रक्तरंजित संघर्ष! VIDEO

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
मुंबई,
bmc-office-dispute : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ-उत्तर (F-North) वॉर्ड कार्यालयाबाहेर टेंडर भरण्याच्या वादावरून दोन कंत्राटदारांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन एका कंत्राटदारावर धारदार शस्त्राने (सुऱ्याने) प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हिंसक घटनेत दोन कंत्राटदार गंभीर जखमी झाले असून या घटनेची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर चित्रफित (व्हिडिओ) समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे.
 

BMC 
 
 
नेमका वाद कशावरून?
 
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या एफ-उत्तर वॉर्ड कार्यालयात विविध विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेवरून दोन गटांतील कंत्राटदारांमध्ये आधी बाचाबाची झाली. कार्यालयातून बाहेर पडताच हा वाद विकोपाला गेला आणि भररस्त्यात दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांना भिडले. याच दरम्यान एका टोळक्याने धारदार सुरा काढून दुसऱ्या कंत्राटदारावर हल्ला चढवला.
 
परिसरात घबराट आणि पोलिसांचा तपास
 
पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयाबाहेर भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून व्हायरल झालेल्या चित्रफितीच्या (व्हिडिओ) आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
 



सौजन्य: सोशल मीडिया