५२६ ग्रॅम गांजासह २६ हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
वर्धा,
526 grams of cannabis seized स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार ३ रोजी सेलू तालुयातील केळझर येथे धडक कारवाई करून ५२६ ग्रॅम गांजासह २६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना केळझर येथे काही व्यती गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
 
 
526 grams of cannabis seized
 
पोलिसांनी केळझर येथील गणेशनगर वार्ड १ परिसरातील रूखा धनवे याच्या घरी धाड टाकून पाहणी केली. रूखा धनवे व त्याचा मुलगा आशीद धनवे हे दोघे संगनमताने गांजा विक्री करताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी गांजा, गांजा विक्रीतून मिळालेली रोकड, मोबाईल असा २६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले यांनी केली.