वाठोड्यात ‘एक्झॉटिका स्पा’वर गुन्हे शाखेची धाड

-: देहव्यवसाय चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल : ३ पीडित तरुणींची सुटका

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
crime-branch-raids : वाठोडा परिसरात असलेल्या ‘स्पा सेंटर’मध्ये मसाजच्या नावाखाली सुरू देहव्यवसाय सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत हा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या दलदलीत फसलेल्या तीन पीडित तरुणींची सुटका केली.
 
 
KL
 
माहितीनुसार, वाठोडा ले-आऊट, जय जलारामनगर येथील ‘एक्झॉटिका स्पा’मध्ये अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी रात्री छापा मारला. या कारवाईत स्पा चालवणारी महिला आरोपी सारिका चंद्रकांत श्रीराव (४८) आणि मॅनेजर चंद्रकांत दिवाकर श्रीराव (५९) हे तीन पीडित तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ हजार रुपयांची रोकड, ऑनलाईन पैसे स्वीकारण्याचे २ फोन पे बॉक्स, ५ मोबाईल असा एकूण ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पसार झालेली के-अरटेकर कामिनी कुमारी हिचा पोलिस शोध घेत आहे.