कामठी तंत्रनिकेतनात नशामुक्ती कार्यशाळा

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
नागपूर (कामठी,)
De-addiction Workshop कामठी तंत्रनिकेतन येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी आश्रमाच्या सहकार्याने 'नशामुक्ती अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

nasha 
 
 
 
कार्यशाळेत मंगेशभाई, रूपेशभाई, संजयभाई आणि बी.के. अनिता यांनी व्यसनाचे दुष्परिणाम व व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्य मुकेश घोळस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यशस्वी आयोजनासाठी छायाचित्रा कश्यप, उके, देवळीकर, हुमणे, साधू तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. उपस्थितांनी व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला.
सौजन्य:रवींद्र साधू ,संपर्क मित्र