हिंगणघाट,
dead-body-found-in-the-well : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली विवाहित महिला गुंजन प्रशांत इंगळे (३८) आणि मंगेश भुजंग खेरे (३४) दोन्ही रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट यांचा मृतदेह वालधूर शिवारातील पिंपळगाव—येडे उमरी मार्गावरील शेतातील विहिरीत आढळून आला. विशेष म्हणजे, दोघांचेही मृतदेह एकमेकांच्या कमरेला दुपट्ट्याने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.
गुंजन इंगळे या विवाहित असून त्यांना ४ वर्षांची मुलगी आहे. रविवारी गुंजन ही विवाहिता मंगेश सोबत दुचाकीने घराबाहेर पडली. त्यानंतर दोघेही बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंबीयांसह पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, घटनास्थळी दोघांचे मोबाईल विहिरीजवळ आढळून आले. प्राथमिक तपासात आत्महत्येची शयता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास प्रवीण देशमुख, संग्राम मुंडे करीत आहे.