नवी दिल्ली,
fire-boltt : आणखी एक भारतीय ब्रँड भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रवेश करणार आहे. ही कंपनी २५ ऑगस्ट रोजी आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करत आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने या फोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. वृत्तानुसार, कंपनी दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
२५ ऑगस्ट रोजी दोन फोन लॉन्च होणार
भारतीय वेअरेबल डिव्हाइस निर्माता फायर-बोल्टने बोल्ट ब्रँड अंतर्गत आपल्या आगामी स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनी २५ ऑगस्ट रोजी इव्हो ४जी (Evo 4G) आणि एस ५जी (Ace 5G) हे दोन मॉडेल लॉन्च करत आहे. दोन्ही फोन अलीकडेच अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसले आहेत. तथापि, कंपनीने फोनच्या वैशिष्ट्यांविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
बोल्टने ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर एक टीझर प्रसिद्ध केला आहे, ज्यात म्हटले आहे की त्यांचा पहिला स्मार्टफोन २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सादर केला जाईल. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार, दोन्ही स्मार्टफोन क्लीन सॉफ्टवेअरसह येतील, ज्यामुळे वापरकर्त्याला एक सुरळीत अनुभव मिळेल.
डिझाइन समोर आले
फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून फोनच्या फ्रंट पॅनलचे डिझाइनही समोर आले आहे. यामध्ये मध्यभागी पंच-होल डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या भोवती जाड बेझल्स आहेत. हे बोल्ट फोन बजेट किंमत श्रेणीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. टीझरमध्ये फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणे दिसत आहेत.
फायर-बोल्ट इव्हो 4G स्मार्टफोन नुकताच गीकबेंचवर दिसला होता. लिस्टिंगनुसार, या फोनमध्ये युनिसॉक T7250 चिपसेट वापरला जाईल. फोनमध्ये 4GB रॅम आणि अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टम असेल. लिस्टिंगमध्ये सिंगल-कोर स्कोअर 440 आणि मल्टी-कोर स्कोअर 1470 दाखवण्यात आला.
देशांतर्गत ब्रँड लावाने गेल्या महिन्यात विराट V1 सिरीज लाँच केली. लावाने या सिरीजमध्ये एक 4G आणि एक 5G फोन लाँच केला आहे. हे फोन शक्तिशाली 6000mAh बॅटरीसह येतात. त्यांची किंमत ₹8,999 पासून सुरू होते. लावा विराट V1 4G मध्ये युनिसॉक SC9863A चिपसेट वापरण्यात आला आहे. या फोनला IP64 रेटिंग आहे.