‘त्या’ विहिरीवर लोखंडी जाळी बसवा अन्यथा आंदोलन

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
समुद्रपूर, 
iron-grate-on-the-well : शहरातील स्वप्ननगरी वार्ड १४ परिसरातील खुल्या जागेत असलेली मोठी विहीर मृत्यूचा सापळा बनली आहे. त्या विहिरीवर तातडीने लोखंडी जाळी बसवण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. ३ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
 

KL 
 
 
 
लागोपाठ दोन आत्महत्येच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. स्वप्नगरी परिसरातील ही विहीर सध्या पूर्णपणे उघडी असून तिला लोखंडी जाळी नाही. काही दिवसांपूर्वी एका महिलेने या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ती घटना ताजी असतानाच २ रोजी पुन्हा एका इसमाने याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ती विहीर निवासी भागात असल्याने लहान मुले व पादचार्‍यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. विहिरीच्या आजूबाजूला लहान मुले खेळत असतात. विहीर उघडी असल्याने खेळणारे मुले किंवा पादचारी विहिरीत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
 
निवेदन देतेवेळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष शेषराव तुळनकर, माजी नगराध्यक्ष शीला सोनारे, भाजयुमो अध्यक्ष रजत भुरे, नगरसेवक ललित डगवार, मोनिका बेलेकर, सुशीला लढी, आदी उपस्थित होते.