मद्यप्रेमींना मोठा झटका, पाच लोकप्रिय ब्रॅण्डवर भारतात बंदी

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
एफएसएसआयएने केली कारवाई
 
 
नवी दिल्ली,
five popular brands banned in india भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसआयए) ने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांवर कारवाई केली आहे. यामध्ये ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज, अँटीक्विटी ब्ल्यू या ब्रँड्सचा समावेश आहे. ही कारवाई काही विशिष्ट उत्पादने आणि उत्पादन केंद्रांमधील नियमभंगाच्या आरोपांशी संबंधित आहे.
 
 
five popular brands banned in india
 
एफएसएसआयए च्या तपासात काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरित्या परिपक्व झाल्यासारखा स्वाद व सुगंध देण्यासाठी कृत्रिम किंवा ‘नेचर आयडेंटिकल’ फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप आहे. एफएसएसआयए च्या नियमांनुसार रम, व्हिस्की, ब्रँडी, जिन यांसारख्या मद्यांमध्ये त्यांचा विशिष्ट स्वाद हा उत्पादन प्रक्रियेतून आणि मूळ घटकांमधून यायला हवा. कृत्रिम फ्लेवर वापरण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ही कारवाई सर्व बाटल्यांवर किंवा सर्व राज्यांतील उत्पादनांवर लागू आहे की काही विशिष्ट उत्पादन केंद्रांपुरती मर्यादित आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
 
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम,व्हिस्कीवर बंदी
ओल्ड मॉन्क (काही व्हेरियंट्स)
मॅकडॉवेल्स
बॅगपाइपर
रॉयल चॅलेंज
अँटीक्विटी ब्ल्यू
एफएसएसएआयची कारवाई का?
विक्रीस मनाई केलेले प्रॉडक्ट्स सुमार दर्जाचेच नव्हे तर दिशाभूल करणारे...
रम किंवा व्हिस्की मूळ पदार्थांपासून बनवण्याऐवजी फ्लेवर टाकून बनवलेले.
फ्लेवर टाकल्यामुळं रम किंवा व्हिस्कीची मूळ विशेष चव आणि गंध हरवला.
मोलेससद्वारे रम किंवा माल्टद्वारे व्हिस्की बनवण्याऐवजी फ्लेवर टाकल्यानं चव,गंध हरवला.
प्रॉडक्ट कशापासून बनवले आहे त्याचाही स्टिकरवर उल्लेख नाही.
रम फ्लेवर्ड स्पिरिट किंवा व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट म्हणून विकायला हवे.
कंपन्यांची भूमिका काय आहे?
संबंधित उत्पादनांची विक्री काही ठिकाणी तात्पुरती थांबवली जाऊ शकते. अंतिम न्यायालयीन किंवा नियामक निर्णय येईपर्यंत परिस्थिती बदलू शकते. दरम्यान, संबंधित कंपन्यांनी नियमांचे पालन केल्याचा दावा केला असून काही कंपन्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या मते हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेपेक्षा नियमांच्या व्याख्येशी संबंधित आहे.