तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
maya-shere : भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ महिला नेत्या, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगर परिषद सदस्य माया शेरे यांची भाजपा महिला आघाडी प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाèया माया शेरे यांनी भाजपा महिला आघाडीत 20 वर्षे विविध पदांवर कार्य करत संघटन बळकटीसाठी बहुमोल योगदान दिले आहे. त्यांचे संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठेची यांनी दखल घेत भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी त्यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली आहे.