नवयुग प्राथमिक शाळेत थोरपुरुषांना अभिवादन

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Navayug Primary School नवयुग प्राथमिक शाळा, राजाबाक्षा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
 

yug 
 
 
मुख्याध्यापक अजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रवीण खणगण, राजेश सितवीर आणि शिल्पा ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती सादर केली. राकेश कडू यांनी लोकमान्य टिळक, तर आनंद बुरडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणात अजय काळे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन मितल ठाकरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रिया नाखले यांनी केले.
सौजन्य : जयश्री बोबडे,संपर्क मित्र