नवी दिल्ली
railway material stolen भारतीय रेल्वेच्या वातानुकूलित (एसी) डब्यांमधून बेडरोल साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार चिंताजनक पातळीवर पोहोचले आहेत. माहिती अधिकार अंतर्गत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 ते मे 2026 या कालावधीत देशभरातील एसी डब्यांतून तब्बल 1.27 कोटी बेडरोल वस्तू गायब झाल्या आहेत. या प्रकारामुळे लिनन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना 104.51 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून रेल्वे व्यवस्थेवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे.
रेल्वेच्या प्रत्येक एसी प्रवाशासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बेडरोल किटमध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, उशीचे अभ्रे आणि एक फेस टॉवेल यांचा समावेश असतो. मात्र, प्रवास संपल्यानंतर हे साहित्य परत न करता अनेक प्रवासी ते सोबत घेऊन जात असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.उपलब्ध माहितीनुसार, सर्वाधिक चोरी झालेल्या वस्तूंमध्ये फेस टॉवेल अव्वल क्रमांकावर आहेत. गेल्या चार वर्षांत सुमारे 46.54 लाख फेस टॉवेल, 41.13 लाख चादरी, 23.59 लाख उशीचे अभ्रे, 12.95 लाख ब्लँकेट आणि 2.76 लाख उशा गायब झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, 2022 ते 2025 या कालावधीत देशातील 18 पैकी 16 रेल्वे विभागांमध्ये लिनन साहित्य चोरीच्या घटनांमध्ये तब्बल 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या चोरीमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर पुढील प्रवाशांना वेळेवर स्वच्छ आणि उपलब्ध बेडरोल देण्यातही अडचणी निर्माण होतात. विशेषतः सणासुदीच्या काळात, सुट्ट्यांच्या हंगामात आणि प्रवाशांची संख्या वाढलेल्या दिवसांत ही समस्या अधिक तीव्र होते. आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त खरेदी करावी लागत असून त्याचा आर्थिक भार वाढत आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.railway material stolen बेडरोल साहित्याची तपासणी अधिक प्रभावी करण्याबरोबरच प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यावरही भर दिला जात आहे. रेल्वे अधिकाèयांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, बेडरोलमधील सर्व साहित्य ही भारतीय रेल्वेची मालमत्ता आहे. त्यामुळे प्रवास पूर्ण झाल्यानंतर ते संबंधित कर्मचाèयांकडे परत करणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे.