हिंगणघाट,
sahakar samvad वर्धा जिल्हा सहकार भारती, जिल्हा उपनिबंधक सह संस्था, अभिनव महिला बचत गट यांच्या संयुत वतीने सहकार संवाद कार्यक्रम शनिवार ८ ऑगस्ट रोजी स्थानिक स्व. डॉ. रामदासजी आंबटकर योग भवन नंदोरी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सहकार संवाद कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत, असून प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सहायक निबंधक स्वप्नील पुराम, सहकार भारतीचे नागपूर विभाग प्रमुख संजय रोकडे तर मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण सदानंद वुईके उपस्थित राहतील. या सहकार संवाद कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरी सह. पतसंस्था, बँकांचे संचालक, पदाधिकारी, कर्मचार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वर्धा जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष प्रभाकर कोळसे, संघटन प्रमुख मनोज पाचखेडे, महामंत्री प्रमुख श्यामकुमार खत्री, प्रशांत मुळे, सचिव भास्कर थोटे, उपाध्यक्ष अनघा आगवन, आदींनी केले आहे.