शिशिर बोबाटे यांची भारत सरकारच्या वैज्ञानिक पदावर नियुक्ती

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
shishir bobate कुरखेडा येथील रहिवाशी शिशिर मधुकर बोबाटे यांची भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड मध्ये वैज्ञानिक या पदावर नियुक्ती झालेली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. शिशिर हा लहानपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचा म्हणून ओळखला जातो. त्याचे नर्सरीचे शिक्षण लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट कुरखेडा सध्याचे छत्रपती इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये झाले. त्यानंतर पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण विकास प्राथमिक शाळा कुरखेडा येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नेवजाबाई हितकारणी विद्यालय ब्रम्हपूरी येथे तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून घेतले.
 
 
शिशिर बोबाटे
 
 
पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र विषयात अंतिम वर्षाला असताना, सीएसआयआर, नीट, जेआरएफ ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. तसेच सेट, डीबीटी, बीइटी, जेआरएफ आणि गेट या परीक्षा देखील पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. भारतीय विषविज्ञान संशोधन संस्थेतून तो आचार्य पदवीचा अभ्यास करीत आहे. शिशिरला यापूर्वीही गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागात नोकरीची संधी आलेली होती. मात्र त्यांनी ती तेव्हाच नाकारली.shishir bobate गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिशिरची केंद्र सरकारच्या वैज्ञानिक पदावर निवड होणे ही केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी भूषणाची गोष्ट आहे. वडील वरिष्ठ लिपिक म्हणून गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले, तर आई गृहिणी आहे. त्याच्या या यशाबद्दल दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे तसेच शहर विकास मंचचे सर्व पदाधिकारी व मित्रमंडळींकडून अभिनंदन होत आहे.