’स्पायडर-मॅन ४’ ने पाचव्या दिवशी विक्रम रचला

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
मुंबई, 
spider man 4 हॉलीवूडचा चित्रपट ’स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच चांगली कमाई करत नाही, तर जगभरातही विक्रम रचत आहे. प्रेक्षक बॉक्स ऑफिसवर हॉलीवूडचा चित्रपट ’द ओडिसी’वरही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपट ’जना नायकन’ देखील आपली छाप पाडत आहे.
 
spider man 4
 
’स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने चौथ्या दिवसाच्या ७७.७५ कोटींच्या तुलनेत, सोमवारी, म्हणजेच पाचव्या दिवशी, २३.८० कोटींची कमाई केली. चित्रपटाची भारतातील एकूण कमाई २८१.७५ कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटात टॉम हॉलंड पुन्हा एकदा स्पायडर-मॅनच्या भूमिकेत आहे. दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन.
 
’स्पायडर-मॅन ४’ ने जगभरात विक्रम रचला
’स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ ने जगभरात ९२७ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ₹८,८९४ कोटी) कमावून, पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ’ॲव्हेंजर्स: एंडगेम’ने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात १.२ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹११,००० कोटी) कमावले होते.