हिंदी विद्यापीठात त्रिदिवसीय प्रदर्शन

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
वर्धा,
hindi university महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिक्षण समागम २०२६ अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी भवनातील स्वामी सहजानंद सरस्वती संग्रहालयात ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान त्रिदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ४ रोजी कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांच्या हस्ते झाले.
 
 
 
या प्रदर्शनात विद्यापीठाच्या संग्रहालयात उपलब्ध १९व्या शतकापासून आजपर्यंतच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या नियतकालिके आणि हस्तलिखितांचे दर्शन घडणार आहे. या साहित्यकृती पाहण्याचा आणि वाचण्याचा अनुभव साहित्य इतिहासाच्या जिवंत स्पर्शाची अनुभूती देणारा आहे. संग्रहालयात तुलसीदास लिखित हनुमान बाहुक, विजय दोहावली, विनयपत्रिका सटीक, षोडश रामायण, कुंडलिया रामायण यांसह हजारो महत्त्वपूर्ण हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. हिंदी साहित्याच्या समृद्ध वारशाच्या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरेचे दर्शन घडविणारी संग्रहालयातील सामग्री या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. विद्यापीठाने सर्व नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.