समुद्रपूर,
tiger devours cow loss of 50000 जाम शिवारात शेतात बांधून असलेल्या गायीवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. या घटनेत शेतकरी विजय अवघडे यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. ही घटना सोमवार ३ रोजी जाम-शेडगाव येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विजय अवघडे यांच्या जाम शिवारातील शेतामध्ये जनावरे बांधून होती.
सोमवार ३ रोजी वाघाने एका गायीवर हल्ला करून ठार केले. तसेच तिला ओढत नेऊन नाल्यामध्ये ओढत नेले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी राजेंद्र धनविज, बीट रक्षक शशिकांत शेंदरे, पोलिस पाटील कवडू सोमलकर घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोन दिवसापासून जाम, शेडगाव, आजदा परिसरात वाघ वास्तव्यास आहे. या वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहे. वाघाचा परिसरात वावर लक्षात घेता शेतकरी व नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे यांनी केले आहे.