वाशीम,
washim market हळद हे मसालावर्गीय व गुणकारी औषधीयुक्त पीक आहे. त्यामुळे हळदीची मागणी भारतातच नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादन घटल्याने हळदीच्या भावात प्रचंड तेजी आली. सुरुवातीला १२ ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल विकणारी हळदीला आता १८ हजारावर भाव मिळत असून, आगामी काळात भावात वाढ होण्याची शयता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
वाशीम जिल्ह्यात हळदीच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असून, हळद उत्पादक शेतकर्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ताज्या लिलावात कांडी हळदीला प्रतिक्विंटल १८ हजार ३५० रुपये इतका कमाल दर मिळाला असून, यंदाच्या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर ठरला आहे. बाजार समितीच्या माहितीनुसार, मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात सुमारे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे आणि दर्जेदार हळदीला मिळणार्या चांगल्या प्रतिसादामुळे बाजारात तेजीचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे. कांडी हळदीला मिळालेल्या विक्रमी दरामुळे हळद उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.washim market व्यापार्यांकडून दर्जेदार हळदीला मोठी मागणी असल्याने आगामी काळातही दरात तेजी कायम राहण्याची शयता व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना हळदीला मिळालेल्या या चांगल्या दरामुळे शेतकर्यांना आर्थिक दिलास मिळाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी योग्य बाजारभावाचा लाभ घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने हळदीची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, बाजारातील मागणी, आवक आणि गुणवत्तेनुसार हळदीचे दर पुढील काळातही चढ-उतार होण्याची शयता असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र सध्याचा विक्रमी दर हळद उत्पादकांसाठी दिलासा देणारा आहे.