त्रिशा प्रकरणात मोठी कारवाई; उदयनिधींना अटक! VIDEO

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
udhayanidhi-stalin : चेन्नई पोलिसांनी माजी उपमुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक केली आहे. तामिळनाडू पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी, एका सभेत अभिनेत्री त्रिशाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून डीएमके कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्रिशाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे स्टॅलिन यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त नरेंद्रन नायर यांनी पुष्टी केली की, मुख्यमंत्री विजय यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 

trisha 
 
 
 
पोलिसांनी स्टॅलिन यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले
 
डीएमके नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी त्यांच्या चेन्नई येथील घरातून ताब्यात घेतले असून अटक केली आहे. अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल त्यांच्या सभेत अभिनेत्री त्रिशाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ज्या ईसीआर रस्त्यावरून पोलीस उदयनिधी यांना घेऊन जात आहेत, तो रस्ता डीएमके समर्थकांनी अडवला असून रस्त्यावरून सर्वांना हटवणाऱ्या पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत आहेत.
 
टीव्हीकेने आंदोलनाचा इशारा दिला होता
 
तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी टीव्हीकेने आंदोलनाचा इशारा दिला होता. चेन्नईतील उदयनिधी स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांना चेन्नईहून तंजावरला नेण्यात येत असल्याचे वृत्त आहे, जिथे औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
 
 
 
 
संपूर्ण प्रकरणाबद्दल जाणून घ्या
 
कावेरी वादासंदर्भात तंजावर येथे आयोजित एका निषेध सभेला संबोधित करताना उदयनिधी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, तामिळनाडूला कावेरीच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही, तर मुख्यमंत्री या प्रकरणाकडे उदासीन आहेत. गर्दीतील कोणीतरी 'त्रिशा, त्रिशा' असा जयघोष सुरू केल्याने या सभेला वादाचे स्वरूप आले. उदयनिधी यांनी त्यांचे भाषण थांबवून अशी वक्तव्ये केली, जी अनेकांना आक्षेपार्ह आणि द्व्यर्थी वाटली, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. भाजपने स्टॅलिन यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. सत्ताधारी टीव्हीकेचे नेतेही त्याच्या अटकेची मागणी करत आहेत.