वर्धा,
kumud sharma महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांना साहित्य, पत्रकारिता, शिक्षण आणि हिंदी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रेमचंद पुरस्कार—२०२६ प्रदान करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार २ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंडो-नॉर्वेजियन इन्फॉर्मेशन अॅण्ड कल्चरल फोरम, नॉर्वे यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला.
हिंदी भाषा, भारतीय साहित्य आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जागतिक प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यतींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रा. कुमूद शर्मा यांनी हिंदीची जागतिक प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इंडो-नॉर्वेजियन इन्फॉर्मेशन अॅण्ड कल्चरल फोरम ही एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संस्था असून भारत, नॉर्वे आणि इतर विविध देशांच्या संस्कृतींमधील संवाद व सहकार्य दृढ करण्यासाठी ती कार्यरत आहे.