वर्धा कुस्ती प्रशिक्षण केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात

    दिनांक :04-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-wrestling-training-centre : येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल केंद्रात गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रातील युवा मल्लांनी आपले वस्ताद व मार्गदर्शक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यत केली.
 
 
 
wardha-wrestling-training-centre
 
 
 
यावेळी उपस्थित युवा मल्लांनी पैलवान शिवम जाधव, ऋषिकेश बोधाने, वेदांत चव्हाण, सार्थक सोनगडे, श्रावणी मेश्राम यांनी कुस्तीचे विविध पारंपरिक व आधुनिक डावपेच आणि कसरतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावेळी अक्रम पठाण, नितीन शेंडे, मधुकर धोटे, पैलवान संकेत पाटील, जय कापसे, वीर भगतसिंग फाउंडेशनचे मयूर आकुलवार यांनी पैलवानांना चांगला आहार, नियमित सराव आणि खेळातील अनुशासन यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी महावीर वरहारे, महिला प्रशिक्षक दीपाली धुर्वे, बॉसिंग प्रशिक्षक शुभम जुगनाके आदी उपस्थित होते.