वर्धा,
wardha municipal council मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत असलेले ॲड. गुरुराज राऊत यांची वर्धा नगरपालिकेच्या अधिकृत अधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. राऊत ८ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई व नागपूर खंडपीठासह विविध दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करीत आहेत. दिवाणी, फौजदारी, घटनात्मक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांना अनुभव आहे.