चेन्नई,
announcement by the Vijay government तामिळनाडूतील टीव्हीके सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकत महिलांना सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी देण्याच्या योजनेसाठी ८१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तामिळनाडूचे अर्थमंत्री एन. मेरी विल्सन यांनी बुधवारी विधानसभेत टीव्हीके सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मांडताना त्यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सार्वजनिक निविदांमध्ये काही पक्ष आणि व्यक्तींना मिळणाऱ्या कथित 'कट' किंवा कमिशनची पद्धत बंद करण्यात आल्याचे सांगितले.

अर्थसंकल्पात अल्पसंख्याक समाजासाठीही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. प्रथमच हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना दिले जाणारे अनुदान २५ हजार रुपयांवरून ३५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना यापुढे १० हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना आणि सामाजिक क्षेत्रासाठी वाढीव निधीच्या माध्यमातून सरकारने आपल्या निवडणूक आश्वासनांच्या पूर्ततेला प्राधान्य दिल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.