हडस प्रायमरीत भारतमाता पूजन

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
नागपूर,
bharatmata pooja at hadas primary विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हडस प्रायमरी स्कूल येथे भारतमाता पूजनाचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवाजीनगर शाखेचे शेखर देशपांडे आणि मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 
bharatmata pooja at hadas primary
 
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशपांडे यांनी देशप्रेमाची संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात समजावून सांगितली. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अत्यावश्यक प्लास्टिकचा योग्य प्रकारे पुनर्वापर आणि विनिमय कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून दिले.
 
प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. वापरातील प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरून 'इको ब्रिक' तयार करण्याची संकल्पना आणि त्या इको ब्रिकच्या साहाय्याने भिंत उभारण्याचा प्रस्ताव देशपांडे यांनी शाळेसमोर मांडला. या उपक्रमाचे मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी स्वागत करत तो स्वीकारला. कार्यक्रमाची सांगता 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
सौजन्य: गजानन रानडे, संपर्क मित्र