वर्धा,
bjp district organizational meeting भारतीय जनता पार्टी, जिल्हा वर्धाची संघटनात्मक बैठक भाजपाचे विदर्भ विभागाचे संयोजक प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक बाबींवर चर्चा होऊन पक्ष वाढीसाठी काय करता येईल यावर मंथन करण्यात आले. सोबतच जिल्ह्यातील सर्व बूथ सक्षम करणे, मोर्चा आघाड्यांकडे विशेष लक्ष देऊन त्या सक्षम करणे, सरकार व संघटन यांच्यात समन्वय ठेवून जनतेची कार्ये मोठ्या प्रमाणात करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, मोर्शी जिल्हा प्रभारी अविनाश देव, महामंत्री कमलाकर निंभोरकर, आकाश पोहाणे, अशोक कलोडे, श्रीधर देशमुख, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, भूपेंद्र शहाणे, जयंत कावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.