शहीद जवानाच्या कुटुंबीयांंना 1 कोटी 10 लाखाचा धनादेश सुपूर्द

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात झाले होते शहीद

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
आलापल्ली
alapalli-news भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणारे सी-60 दलातील शूर जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या टर्म पॉलिसीअंतर्गत 1 कोटी 10 लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला. या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

news photo 
 
alapalli-news दीपक मडावी यांनी सेवेत असतानाच भारतीय स्टेट बँकेत खाते उघडून एसबीआय लाईफची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. त्यांच्या निधनानंतर विमा दावा मंजूर झाल्यानंतर अहेरी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पत्नी शालिनी दीपक मडावी यांना अधिकार्‍यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या त्यागाला अभिवादन केले.
 
alapalli-news धनादेश वितरण कार्यक्रमाला अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हृदयनाथ, सी-60 चे प्रभारी अधिकारी राहुल देवडडे, एसबीआय लाईफचे बिझनेस मॅनेजर शिवाजी होडबे तसेच विमा सल्लागार तिरुपती बोम्मनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.