काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी

गोंदियात जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
गोंदिया
protest-by-womens-ncp महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत बुधवारी ५ ऑगस्ट रोजी स्थानिक गांधी प्रतिमा चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी घोषणाबाजी करून काँग्रेसने सार्वजनिकरित्या जाहिर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.

ncp 
 
protest-by-womens-ncp  राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवरून मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटत असून गोंदियात खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांच्या निर्देशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध नोंदवून सार्वजनिक माफी मागा आंदोलन करण्यात आले. यावेळी तुरकर म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कदापिही खपवून घेतला जाणार नाही. सुनेत्राताई यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य हा केवळ त्यांचा नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे.
 
protest-by-womens-ncp  फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान हीच खरी संस्कृती आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व महिलांची जाहीर व सार्वजनिक माफी मागावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. यावेळी या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्या मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.