उत्पादन खर्चात वाढ; कापूस, सोयाबीनला हमीभाव आवश्यक

पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची मागणी

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वर्धा,
shankarprasad agnihotri शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ झाल्यामुळे कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये आणि सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव देऊन शेतकर्यांचे आर्थिक संरक्षण महत्त्वाचे आहे. बियाणे, खतं, शेतीतील यंत्रसामग्री आणि रोजच्या कामावरील मजुरीखर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या हमीभावात वाढ करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केली आहे.
 
 
shankarprasad agnihotri
  
शासनाने आधारभूत दरवाढ करून शेतकर्यांना पेरणीपूर्वी एकरी ५ हजार रुपये अनुदान, सुलभ कर्ज, सवलतीचे साठवण आणि प्रक्रिया यंत्रणा आणि विमा पॉलिसींचा वेगवान दाव्यांची प्रक्रिया यासारखे समग्र उपाय करावे लागतील. तसेच, उत्पादकांसाठी तंत्रज्ञान व प्रशिक्षण देऊन उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे.
 
बियाणे व खतांचे दर, कीटकनाशके, सिंचन खर्च वाढल्याने प्रति हेक्टर उत्पादनाचा खर्च पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढीमुळे उत्पादनातून शेतकर्यांना मिळणारे निव्वळ उत्पन्न घटत असल्याने कापूस आणि सोयाबीनला खर्चावर आधारित भाव देण्याची मागणी प्रगतशील शेतकरी अग्निहोत्री यांनी केली आहे.