वाशीम शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

अतिक्रमणीत देशी दारु दुकानावर चालला गजराज

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
वाशीम,
encroachment removal शहराच्या अंतर्गत भाग व मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरत असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगर परिषद प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहीमे अंतर्गत दिघेववाडी कुंभारपुरा परिसरातील अतिक्रमण जागेत सुरु असलेले देशी दारुचे दुकान तसेच भंगार व्यवसायिकांचे दुकाने हटविण्यात आली. या मोहीमेचा अनेकांनी धसका घेतला आहे.
 
 
encroachment removal
 
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. फेरीवाले, भाजीवाले, खाद्यपदार्थ व चहाच्या टपर्‍या, तसेच दुकानांच्या फलकांनी शहरातील रस्ते अडवल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. शहरातील दिघेवाडी, शुक्रवार पेठ परिसरातील देशी दारु दुकान व काही भंगार व्यावसायिकांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण या मोहीमे अंतर्गत काढण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे शहरातील चौक, रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू असल्याने अतिक्रमणधारकांचा फारसा विरोध झाला नाही. कारवाईच्या भीतीपोटी अनेक जण आपले अतिक्रमण स्वत:च काढून घेत आहेत.
 
 
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी न. प. प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून, शहरातील दिघेवाडी, कुंभार पूरा, स्वागत लॉन तसेच पुसद नाका परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले आहे. टप्याटप्प्याने सर्व प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती न.प. प्रशासनाने दिली. अतिक्रमण काढतांना प्रशासनाने दुप्पटी भूमिका घेतल्याचा आरोप काही अतिक्रमणधारकांनी केला आहे. अतिक्रमण हटाव मोहीमुळेमुळे श्वास गुदमरलेले रस्ते व चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, पाटणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रिसोड नाका चौकात नप प्रशासनाच्या जागेवर अनेकांनी पक्के अतिक्रमणे केली आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देवून कुठलाही भेदभाव न करता कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.