वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जनकापूर येथील घटना

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
नागभीड,
farmer killed in tiger attack तालुक्यातील जनकापूर येथील जंगलालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रमेश जयराम काशीवार (55) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
 
 
farmer killed in tiger attack
 
रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास शेतातील रोपांना पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार केले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे जनकापूर व परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून, जंगलालगतच्या शेतात जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.