तळेगाव (श्या.पंत),
hospitals groundbreaking ceremony उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वीच्या वतीने तळेगाव (श्या.पंत) येथे ८ व ९ ऑगस्टला श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर व आरोग्य अमृत महोत्सव तसेच ३०० घाटांचे सामान्य रुग्णालय व आष्टी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. सुमित वानखेडे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. येथील पी. आर. पाटील कॉलेजमध्ये समाधान शिबिर व आरोग्य अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ, मार्गदर्शन व सेवा एकाच ठिकाणी राहणार असून या शिबिरात त्यात महसूल विभाग, संजय गांधी योजना, पुरवठा योजना, कृषी विभाग, विद्युत विभाग, पंचायत समिती, वनविभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, परिवहन महामंडळ, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, नगरपंचायत, राष्ट्रीयीकृत बँका इत्यादी विभाग एकाच ठिकाणी येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण अमृत महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.