होमिओपॅथी डॉटरांना मेडीकल कौन्सीलची नोंदणी देण्याला आयएमएचा विरोध

डॉक्टरांच्या बंदने आरोग्य सेवा कोलमडली

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
बुलढाणा
ima-buldhana होमिओपथी डॉटरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याचा निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी आयएमएच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि. ५ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली आहे इंडियन मेडीकल कौन्सीलचा ताबा सरकारला घ्यायचा आहे या निर्णयामूळे जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडला असा आरोपी करीत डॉ. जे. बी. राजपूत यांनी केला असून डॉक्रांच्या दवाखाना बंदला आयएमएचा पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
 
ima buldhana
 
 
ima-buldhana इंडियन मेडीकल असो. वतीने शासनाच्या या निर्णयाविरोधात पत्रकार भवन येथे दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला आयएमए अध्यक्ष डॉ राजेंद्र बेदमुथा, सचिव डॉ. जे.बी. राजपूत कोषाध्यक्ष डॉ नितेश छाजेड सदस्य डॉ शैलेश छाजेड प्रामुख्याने उपस्थित होते.
 
ima-buldhana डॉ जे.बी. राजपूत व डॉ राजेंद्र बेदमुथा यांनी सांगितले इंडीयन मेडीकल असोसिएशनकडून ४ ऑगस्ट रोजी निर्णयाच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. दि ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपासून ६ ऑगस्टच्या सकाळी ६ पर्यंत आपत्कालिन नसलेल्या सेवा बंद करण्यात येतील, अशी घोषणाही करण्यात आली आहे. आमच्या मागणीला महाराष्ट्र एसोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉटर्स-मार्ड, सर्व स्पेशालिस्ट राज्य संघटना आणि असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंन्टर्न्स एएसएमआय यांचा संपूर्ण पाठींबा असल्याची माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय व्यवसाय हा नेहमी वैद्यकीय नितिमत्ता आणि रुग्णहितासाठी कटीबद्ध राहिला आहे. तथापि शासनाकडून सातत्याने होत असलेल्या निष्क्रीयतेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवेचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आयएमए कडून तिव्र भूमिका घेण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.
 
ima-buldhana आयएमएचा ताबा घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने घुसखोरी करण्याचे निश्चीत केले आहे. बीएचएमएस डॉटरांना यात नोंदणी देवून आपल्याला हवे ते सदस्य निवडून आणण्याचा सरकारचा डाव आहे. आयएमए सह इतर संघटनांच्या मागणीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तिव्र करून डॉटरांचे अस्तित्व सरकारला दाखवून देऊ असेही डॉ. जे. बी. राजपूत यांनी आपली भूमिका मांडली. तसेच डॉ. नितेश छाजेड यांनीही सरकारच्या आरोग्य विषयक धोरणावर अभ्यासपूर्ण माहिती दिली.