एमडीचा मुख्य सूत्रधार राजस्थानातून अटकेत

राजापेठ पोलिसांनी शिताफीने घेतले ताब्यात

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
अमरावती, 
amravati-police मोठया प्रमाणात अवैध्यरित्या मेफेड्रान (एम.डी.) अंमली पदार्थाचा अमरावती शहरात पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य सूत्रधाराला राज्यस्थान येथून ताब्यात घेवून आज अमरावतीत आणण्यात आले. राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.रामनिवास जगदिशकुमार बिश्नोई (वय २२ वर्ष रा. डुंगरवा ता. बागोडा, जि. जलौर राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे नाव आहे.

amravati police 
 
amravati-police  अमरावतीत १ आॅगस्ट रोजी पोलिसांनी साहील राजेश मेहरा (वय २२ वर्ष रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती) यांच्याकडून ४१ लाख ५५ हजाराचे एमडी व अन्य असा ५३ लाख २९ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. सदर गुन्हाची व्याप्ती मोठया प्रमाणात असल्याने तपासाला गती देण्यात आली. साहील मेहरा याने मॅफेडॉन राजस्थानातील उपरोक्त सूत्रधाराकडून आणल्याचे तपासात पोलिसांना सांगितले होते. त्या आधारावर पोलिस पथक राजस्थानात पोहोचले. रात्र दिवस सतत अथक परिश्रम व वेशांतर करून तेथील स्थानीक पोलिसांचे सहाकार्याने तांत्रिक माहीतीचे आधारे सूत्रधार रामनिवास बिश्नोई याला ताब्यात घेण्यात आले. अन्य आरोपी फरार आहे.
amravati-police  ही कारवाई राजापेठचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि. नितीन शिंदे, पोलिस अंमलदार मनीष करपे, पंकज खटे, रवि लिखितकर, शशीकांत शेळके, पवन तिवारी, अर्जुन कदम, रफिक खान, अंकुश काळे, पंकज गाठे, आकाश यादव, प्रशांत बोलोरकर, अमोल देशमुख यांनी केली. आहे.