बुलढाणा
rare-surgery-in-buldhana येथील सुप्रसिद्ध शल्य चिकीत्सक डॉ. विनायक उबरहंडे, स्त्रीरोगतज्ञ एस. एस. राजपूत दोन डॉटरांनी अत्यंत कठिण लिष्ट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून एका महिलेच्या पोटातून मोठा चरबीच्या मासाचा गोळा काढला आहे. ही शस्त्रक्रिया जाभंरूण रोड वरील न्यू राधे रुग्णालयात यशस्वी पार पडली.
rare-surgery-in-buldhana गेल्या अनेक महिन्यांपासून असा पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय महिला रुग्णावर दोन डॉक्टरांनी तसेच भुलतज्ञ डॉ प्रियंका मोरे पाटील यांनी एकत्र येत हे कठीण शस्त्रक्रिया करीत असतांना या महिला रुग्णाच्या पोटाच्या मागील भागात ६ इंच लांब आकाराचा चरबीच्या मासाचा गोळा वेगाने वाढत होता उजव्या किडनीपासून सोबतच गर्भाशयापर्यंत याशिवाय पायाकडे जाणार्या नसांना सुद्धा इजा पोहचत असल्यामुळे रुग्णाचा जीव धोयात आला होता. डॉटरांच्या तज्ज्ञ टीमने अत्यंत सूक्ष्म नियोजनाद्वारे, शरीरातील इतर कोणत्याही नाजूक अवयवाला इजा न पोहोचवता सुमारे ९०० ग्रॅम वजनाचा हा संपूर्ण चरबीच्या मासाचा गोळा आणि गर्भाशय यशस्वी लॅप्रोटोमी शस्त्रक्रियेद्वारे सुरक्षितपणे शरीराबाहेर काढले.
rare-surgery-in-buldhana डॉटरांच्या या कामगिरीमुळे महिला रुग्णाला नवजीवन मिळाले असून त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. तसेच काढलेला हा गोळा पुढील अंतिम निदानासाठी पाठवण्यात आला आहे. दांडगा वैद्यकीय अनुभव असल्याने अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत रुग्णासाठी वरदान ठरला. आहे.