गोंधळातच आटोपली महानगरपालिकेची सभा

स्वीकृत सदस्यांच्या मुद्द्यावर गदारोळ, गणसंख्येवरूनही आरोप-प्रत्यारोप

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर
municipal-corporation-chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेची बुधवारी आयोजित सर्वसाधारण सभा स्वीकृत सदस्यांच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली. कोरमअभावी उशिरा सुरू झालेली सभा अवघ्या काही मिनिटांतच स्थगित करावी लागली. मात्र, तोवर महापौर यांनी तीन विषय मंजूर करून घेतले. तर दुसरीकडे, ही सभाच बेकायदेशीर असल्याचे सांगत, महानगर विकास आघाडी व काँग्रेसच्या धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर महापौर यांच्या विरोधात निदर्शने केली.
 
chandrapur nmc
 
municipal-corporation-chandrapur भाजपच्या जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनीही बराच काळ सभागृहाबाहेर राहून बहिष्कार टाकला आणि कोरम पूर्ण होऊ न देण्याच कट आखला. भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवकांनीही तीच रि ओढली. तर दुसर्‍या बाजूला भाजपच्या मुनगंटीवार गटाच्या महापौर संगीता खांडेकर यांना काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाची साथ मिळाली. त्यामुळे कोरम पूर्ण झाला आणि सभा सुरू झाली.
 
municipal-corporation-chandrapur स्वीकृत सदस्यांचा विषय पटलावर समाविष्ट न केल्यामुळे विरोधक आधीपासूनच आक्रमक होते. दुपारी 1 वाजताची सर्वसाधारण सभा दुपारी 2 च्या सुमारास सुरू होऊ शकली. गणसंख्या पूर्ण झाल्याची माहिती मिळताच, भाजपचा जोरगेवार गट, काँग्रेसचा धानोरकर गट आणि इतर विरोधी नगरसेवक सभागृहात पोहोचले आणि नियमावलीचे पुस्तक दाखवून ही सभा बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद करू लागले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये तीव्र खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजी सुरू झाली. या गदारोळातच महापौरांनी तीन विषय मंजूर झाल्याचे घोषित करीत सभा स्थगित केली.
 
municipal-corporation-chandrapur या संपूर्ण घडामोडीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अंतर्गत गटबाजी जोरात उघडपणे समोर आली. गदारोळामुळे संत मिराबाई संस्थेचे स्वच्छता कंत्राट, अमृत योजना, सीवरेज आणि शहराच्या इतर महत्त्वाच्या विकासकामांशी संबंधित विषयांवर अपेक्षित चर्चा होऊ शकली नाही. श्री विठ्ठल मंदिर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ’ब’ दर्जा देण्यासह काही विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे सत्ताधार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. आता गणसंख्या आणि सर्वसाधारण सभेच्या वैधतेबाबत प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गदारोळ केल्याने विकास होणार नाहीः महापौर
municipal-corporation-chandrapur कोरम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार सर्वसाधारण सभा सुरू करण्यात आली आणि तीन विषय मंजूर करून सभा स्थगित करण्यात आली. विरोधकांना विकास नको आहे. ते केवळ गदारोळ करीत आहेत. वेगवेगळ्या गटनेत्यांनी स्वीकृत सदस्यांचा विषय रोखण्याबाबत पत्र दिले होते म्हणूनच नियुक्तीला उशीर झाला. स्वीकृत सदस्यांचा विषय पुढील सर्वसाधारण सभेत घेतला जाईल, असे मत महापौर संगीता खांडेकर यांनी व्यक्त केले.