न्यू नागझिर्‍यात अस्वलाच्या हल्ल्यात वनपालाचा मृत्यू

उमरझरी गेटवरील घटनाः वनविभागात खळबळ

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
गोंदिया
nagzira news न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेट येथे कर्तव्यावर असलेल्या वनपालावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने वनपालाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. शामू शरणागत असे त्या मृत वनपालाचे नाव आहे. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली असून, परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

nagzira 
 
 
nagzira news  मिळालेल्या माहितीनुसार, वनपाल शामू शरणागत हे उमरझरी गेट परिसरात नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत होते. याचवेळी अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात शरणागत गंभीर जखमी झाले. मात्र, जखमा गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
 
nagzira news  शरणागत यांच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून नियमानुसार मदत करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून या घटनेमुळे उमरझरीसह लगतच्या गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.